
>> प्रा. वर्षा चोपडे
भटकंती आवडत नाही असा एकही मनुष्य नसेल. कारण माणसाला नावीन्याचे प्रचंड आकर्षण आहे. कोलंबस किंवा हिंदुस्थानला भेट देणारा चिनी यात्रेकरू ह्युएन-त्सांग व इतर अज्ञात पर्यटक ज्ञानाच्या आणि पर्यटन आवडीमुळे जगभर भटकले. हवामान, अन्न, राहण्याची नीट व्यवस्था, भाषा, राहणीमान, कपडे, स्थानिक लोक त्याची संस्कृती आणि सुरक्षा याचा विचार न करता अनेक लोक प्राचीन काळापासून या देशातून त्या देशात फिरायचे. त्यामुळेच जगात अनेक बदल घडले. इंटरनेटच्या काळात तर ते आणखी सोपे झाले आहे.
केरळ देवभूमी नावाने प्रसिद्ध आहे. निसर्गाने आपले सगळे रंग इथे मुक्तपणे उधळले आहेत. हिंदुस्थानचे भूषण असलेले हे राज्य आपले पूर्वपार संस्कार, संस्कृती आणि निसर्गाला जपणारे राज्य म्हणून विख्यात आहे. केरळमध्ये पर्यटन स्थळे आहेत. मंदिर, चर्च, मशिदी यांचे महत्त्व आणि बांधकाम शैली फार आकर्षण वाटली. केरळला स्वर्गभूमी का म्हणतात ते इथलं निसर्गसौंदर्य अनुभवल्यावर नक्कीच आपल्याला कळते. इथला समुद्र, स्वच्छ, नितळ बिचेस अनोखे, पण त्यापैकी कृष्णपुरम पॅलेस वेगळा वाटला.
हा कृष्णपुरम पॅलेस केरळमधील अलाप्पुझा जिह्यातील कायमकुलम येथे स्थित आहे. आता या राजवाडय़ाचे केंद्रीय संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे. हा राजवाडा 18 व्या शतकात त्रावणकोर राज्याच्या अनिझम थिरुनल मार्तंडा वर्मा राजाने (1729-1758 ) बांधला होता. राजवाडा केरळच्या स्थापत्य शैलीमध्ये कृष्णपुरम येथील कृष्णस्वामी मंदिराजवळ असून गॅबल केलेले छप्पर, अरुंद कॉरिडॉर आणि डोर्मर खिडक्यांसह निर्मित आहे आणि आता केरळ सरकारच्या पुरातत्व विभागाने हा राजवाडा पुनर्निर्मित केला आहे. अत्यंत सुंदर राजवाडा आणि विविध इतिहासिक अवशेष यांचे मुख्य आकर्षण आहे.
जवळच सुंदर समुद्र आपले देखणेपण राखून आहे. अलाप्पुझाला अनेक पर्यटक भेट देतात, पण या स्थळाविषयी लोकांना फारसे माहिती नसावे. त्याचप्रमाणे या स्थळला भेट द्यायची असेल तर जवळची ख्एRऊण् बस स्थानकाद्वारे कायमकुलम, ओचिराकरुणागपल्ली आहेत. तसेच जवळची रेल्वे स्थानके ओचिरा, कायमकुलम, करुणागप्पल्ली किंवा खासगी वाहनाने तुम्ही या स्थळाला भेट देऊ शकता. अत्यंत सुंदर असलेल्या या संग्रहालयात विविध मौल्यवान वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. पाण्याची दोन छोटे तळी आपले अस्तित्व टिकवून आहेत. प्राचीन चित्रे आणि शिलालेख, नाणी, मेगालिथिक अवशेष, लाकूड, पितळ आणि दगडी शिल्पांपासून बनवलेल्या कलाकृतींचा खजिना आहे. संकुलातील काही प्रमुख प्रदर्शने आहेत: गजेंद्र मोक्षम, कायमकुलम वल (वल म्हणजे तलवार), दहाव्या शतकातील बुद्धाची मूर्ती आणि औपचारिक भांडी आणि इतर अनेक कलाकृती येथे आपण बघू शकतो.
बुद्ध मंडपम कक्षात दहाव्या शतकातील चार प्राचीन बुद्धांपैकी एकाची आकर्षक मूर्ती आहे, जी अलीकडच्या काळात अलप्पुझा जिह्यातील तलाव आणि शेतात सापडली होती. बुद्ध मंडपम येथे स्थापित केलेली बुद्धमूर्ती ही राजवाडय़ाच्या बांधकामापूर्वीची आहे. पॅलेस कॉम्प्लेक्सभोवती लावलेली विविधरंगी, सुंदर केरळी फुलझाडे मन मोहून घेतात.
अलीकडच्या काळात अलाप्पुझा जिह्यात सापडलेल्या चार बुद्धमूर्ती केरळच्या मावेली राज्यातील ओडानाडू येथील हिनायान बौद्ध धर्माच्या प्रसाराची साक्ष देतात. चार बुद्ध प्रतिमा उष्णिषा म्हणजे टोपी आणि उपविता म्हणजे वरचे वस्त्र सह ध्यानाच्या मुद्रेत आहेत. केरळमधील बौद्ध धर्मविरोधी मोहिमेदरम्यान ते शेतात आणि तलावात टाकण्यात आले होते असे स्थानिक सांगतात. करुणागप्पल्ली येथील मारुतुर्कुलांगरा येथील पुथेनकुला म्हणजे बुद्ध तलावात ही मूर्ती सापडली. खडकाच्या एका तुकडय़ातून कापलेली ही मूर्ती प्रथम करुणागपल्ली शहरात स्थापित करण्यात आली आणि अनेक वर्षांनी कृष्णपुरम पॅलेसच्या कंपाऊंडमध्ये पुन्हा स्थापित केली गेली, जी आता बुद्धमंडपममधील स्मारक आहे. या मूर्तीमध्ये मोती किंवा हिऱयांच्या रेषांनी सजलेली कवटीची टोपी आहे, जी बुद्धाने प्राप्त केलेल्या सर्वोच्च ज्ञानाचे प्रतिनिधित्व करते असे वाटते.
त्याचप्रमाणे, गजेंद्र मोक्ष पेंटिंगबाबत असे सांगण्यात आले की, गजेंद्र म्हणजे हत्तींचा राजावर वर्णन केलेली पौराणिक कथा 10 व्या शतकातील संस्कृत भागवत पुराणात आहे. ती कथा चित्ररूपात बघू शकता. या आख्यायिकेचा संपूर्ण ाढम ज्वलंतपणे या चित्रामधून रंगवलेला आहे. या अप्रतिम चित्रासाठी भाजीपाल्याच्या रंग व इतर नैसर्गिक रंगाचा वापर केला आहे. म्युरलवर मध्यभागी गरुडाचे डायनॅमिक चित्रण आहे. विशाल पसरलेले पंख आणि चेहऱयावरील हावभाव रौद्र (ाढाsधाचे स्वरूप) उत्तम चितरले आहेत. सशस्त्र विष्णूच्या भित्तिचित्रात मध्य-ट्रम्पेटमधील गजेंद्र आणि उजव्या बाजूला मगरीची एक छोटी आकृतीदेखील दर्शविली आहे. भित्तीचित्र केरळ शैलीतील चित्रकलेच्या प्रतिनिधित्व करते.
दंतकथेच्या मुख्य पात्रांव्यतिरिक्त, संत, प्राणी, पौराणिक पशू आणि जंगलातील वनस्पतीदेखील चित्रित केल्या आहेत. म्युरलच्या बाहेरील कडा फ्लोरिएट बॉर्डरने सजवलेल्या आहेत. तळाशी एक अनन्य ट्रिप्टिच-सदृश फलक आहे, ज्यामध्ये बालकृष्ण, लहान कृष्णाचे चित्रण केले आहे.
कृष्णपुरम पॅलेसमधील संग्रहालयात 1886 मध्ये कलकत्ता (कोलकाता) येथे छापलेल्या संस्कृतमधील बायबलची प्रतदेखील आहे. तीन प्रतीतील बायबल आपण बघू शकतो. मुख्य गोष्ट म्हणजे आंचल पोस्ट ही कृष्णपुरम पॅलेसची टपाल सेवा होती. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यापूर्वी त्रावणकोर आणि कोचीन राज्यात सुरू झालेली ही प्रारंभिक टपाल सेवा होती. त्रावणकोरमध्ये 1729 मध्ये राजा अनिझम थिरुनल मार्तंडवर्मा यांनी आणि नंतर 1770 मध्ये कोचीनमध्ये टपालसेवा सुरू केली होती. ती टपाल पेटी राजवाडा परिसरात आजही दिमाखात उभी आहे.
इथे कायमकुलम वाल (वाल म्हणजे तलवार) तलवारीला या संग्रहालयात विशेष महत्त्व आहे. या तलवारीचे महत्त्व असे आहे की, तिच्या दोन्ही बाजू धारदार आहेत आणि त्यामुळे ती इतर कोणत्याही मार्शल शस्त्रांपेक्षा ती अधिक धोकादायक आहे. 18 व्या शतकात कायमकुलम राजांनी याचा वापर केल्याचे सांगितले जाते आणि त्यामुळे ही तलवार राजाची आवडीची होती. राजवाडा हवेशीर आहे. लाकडी पायऱया छोटय़ा आहेत. दुमजली राजवाडय़ाचे रूप मनमोहक आहे.
या राजवाडय़ाला बालगोपालांना घेऊन गेलात तर ऐतिहासिक वारसा आणि बघून त्यांच्यात कुतूहल आणि प्रेम निर्माण होण्यास मदत होईल. हा राजवाडा सकाळी नऊ ते साडेचार. रविवारी खुला असतो आणि सोमवारी बंद असतो. केरळ अलाप्पुझाला आलात तर आवर्जून भेट दयावे असे हे पर्यटन स्थळ आहे. मला वाटते पर्यटन असे करावे त्यातून अनेक चांगल्या गोष्टी शिकाव्या आणि त्या जीवनात उतरवाव्या. हेच आयुष्य आहे. भटकंती महत्त्वाची आहे.
































































