मालमत्ता कर न भरणाऱ्यांच्या घर-दुकानं सील, नगरमध्ये जोरदार कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर शहरामध्ये मालमत्ता धारकांकडे असलेल्या थकबाकीपोटी धडक कारवाई मोहीम महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. मंगळवारी देखील चार ठिकाणी घरांना व दुकानांना सील ठोकले आहे. गेल्या चार दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे.

काही मालकांकडे कोट्यावधी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी २१० कोटीच्या घरात गेली आहे. वेळेत पैसे न भरल्यामुळे दंडाची रक्कमही ८० कोटीच्या घरात गेली आहे. दंड माफीचा फायदा घ्यावा यासाठी दोन महिन्याची मुदत देखील देण्यात आली होती. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने धडक कारवाई हाती घेण्यात आली असून थकबाकीदारांचे चांगलेचधाबे दणाणले आहे.