
विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्यावर गलिच्छ भाषेत टिका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. जनभावनांमध्ये उद्रेक होत आहे. आष्टीमध्ये धनंजय मुंडेंच्याविरोधात प्रचंड मोर्चा निघाला आहे, तर पाटोद्यामध्ये निदर्शने करण्यात आली आहेत. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी धनंजय मुंडे यांचा विडा येथे झालेल्या प्रचार सभेतील पंकजा मुंडे यांच्याविरूद्ध टिका करतानाचा अश्लिल भाषा वापरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर महिलांमध्ये आणि जिल्हाभरातील सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जनभावनांचा उद्रेक होत आहे. आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या टिकेचा निषेध व्यक्त करत आष्टीमध्ये मोर्चाचे आवाहन केले होते.
जगावे की मरावे अशी स्थिती झालीय! ‘त्या’ व्हिडीओबाबत धनंजय मुंडेंचे स्पष्टीकरण
रविवारी सकाळी आष्टीत विराट मोर्चा काढण्यात आला. तर पाटोदा येथे पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. बीडमध्ये महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनीही धनंजय मुंडे यांच्या त्या टिकेवर भाष्य करताना तीव्र शब्दात निषेध केला.
पंकजा मुंडेवर गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका, धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल





























































