
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या हिंदुस्तानच्या जवानांना चिपळूण तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच भ्याड हल्ला करण्याऱ्या पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, शशिकांत मोदी आणि चिपळूण तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






























































