साताऱ्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर दिव्यांगांचे उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खुद्द मुख्यमंत्र्यांच्या जिह्यात दिव्यांग बांधवही पिचला असून, त्यांच्या विविध मागण्यांकडे शासन लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ सातारा जिह्यातील दिव्यांग बांधवांनी आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे या गावी पोहोचून त्यांच्या निवासस्थानासमोर उपोषणाला सुरुवात केली.

आमच्या कोणत्याही मागण्या शासनाकडून मान्य झाल्या नाहीत, आमचे प्रश्न सुटले नाहीत, सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आम्हाला कसल्याही प्रकारे साहाय्य करीत नाहीत, त्यांच्याकडून चांगली वागणूकही मिळत नाही, अशी कैफियत दिव्यांग बांधवांनी मांडली.

जिल्हाधिकारी दखल घेत नसल्यामुळे सातारा जिह्यातील सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने संस्थेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव यांनी आज मुख्यमंत्र्यांचे गाव गाठले व त्या ठिकाणी त्यांच्या घरासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात, तसेच जिल्हाधिकारी आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संस्थेचे जिल्हाध्यक्ष अक्षय बाबर यांनी केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील आणि इथे आमच्या जीवाला काही बरेवाईट झाल्यास्wा त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असे त्यांनी बजावले.