शिवाजी पार्क, चेंबूर, पवईत आंदोलन, धर्मेंद्र प्रधान, भाजप सरकारविरोधात संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज सलग चौथ्या दिवशीही सरकारचा विरोध झुगारून हजारो ‘जेन झी’ रस्त्यावर उतरले. शिवाजी पार्क, चेंबूर, पवई, जुहू आदी ठिकाणी एकत्र येऊन विद्यार्थ्यांनी तरुणांच्या आयुष्याची राखरांगोळी करू पाहणाऱया दळभद्री भाजप सरकारचा धिक्कार केला. नरेंद्र मोदी, धर्मेंद्र प्रधान, दिल्ली पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी आसमंत दणाणून सोडला.

सोनम वांगचुक व दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी आज सलग चौथ्या दिवशीही आपले आंदोलन केले. सरकारच्या दडपशाहीला न जुमानता हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. दरम्यान, मुंबई पोलिसांनी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीकर, 18 जुलै पासून आतापर्यंत किकिध पोलीस ठाण्यांमध्ये बेकायदेशीर जमाक जमकिणे आणि लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी किकिध कलमांअंतर्गत एकूण 13 गुन्हे नोंदकिले आहेत. या गुह्यांमध्ये सुमारे 400 आंदोलकांकर कारकाई करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

वंचितचा आज महाराष्ट्र बंद!

दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱया विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून अमानुष लाठीहल्ला करण्यात आला. या अमानुष कारवाईचा आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध नोंदवण्यासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’ने 23 जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.

उचलले, पण लगेच सोडले 

छत्रपती शिवाजी पार्कात हजारो आंदोलक एकवटले होते. त्यातील 200 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, मात्र सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आले. अभिनेत्री आयेशा खान ही तिचा भाऊ व मित्रांसोबत शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्यासाठी आली होती, पण आंदोलनात सहभागी होण्याआधीच पोलिसांनी तिला उचलले आणि वरळी पोलीस ठाण्यात नेले. यावेळी पोलिसांसोबत धक्काबुक्की झाली, पण सायंकाळी 6 वाजता तिला व तिच्यासोबत आणलेल्यांना सोडून देण्यात आले.