
सामना ऑनलाईन, काठमांडू
पबजी या मोबाईल गेममुळे लहान मुलं आणि तरुण बिघडत चालली असून या खेळाच्या व्यसनामुळे पालक हैराण झाले आहेत. हिंदुस्थानातदेखील ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नेपाळमध्ये हे लहान मुले आणि तरुणांचे आयुष्य या खेळापायी वाया जाऊ नये यासाठी न्यायालयाने पबजीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जर कोणी हा गेम खेळताना दिसले तर त्यांना अटक करण्यात येईल असे तिथल्या पोलिसांनी म्हटले आहे.
न्यायालयाने घातलेल्या बंदीनंतर नेपाळच्या दूरसंचार विभागाने इंटरनेट आणि मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना स्पष्ट शब्दात या पबजीवर बंदी घालण्यात आली असून त्याचे कठोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. हिंदुस्थानात जम्मू कश्मीर आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये पबजीवर बंदी घालण्या आली आहे. चीनमध्येही या गेमवर बंदी घालण्यात आली आहे.





























































