‘पब्जी’सह 118 चिनी ऍप बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गलवान खोऱयातील संघर्षानंतर चिनी ऍपवर बंदीची प्रकिया सुरूच आहे.पब्जीसह 118 चिनी ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे.देशाची सुरक्षा आणि कोट्यवधी युजर्सच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेकनोलॉजीने आयटी कायद्याअंतर्गत सेक्शन 69 प्रमाणे या ऍप्सवर बंदी घातली आहे.पब्जी, लिविक, व्हीचॅट वर्क, व्हीचँट रिडींग, ऍपलॉक आदी 118 ऍप्सवर बंदी घातली आहे.

देशाच्या सुरक्षेला धोका

देशात चिनी मोबाईल आणि चिनी ऍप्स वापरणाऱयांची संख्या प्रचंड आहे. चिनी ऍप्समुळे युजर्सची खाजगी माहिती चोरली जाते. देशाच्या सुरक्षेला धोका आहे त्यामुळे ऍप्स बंदीचे पाऊल उचलल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

आतापर्यंत 224 ऍप्सवर बंदी

  • गलवान खोऱयातील संघर्षानंतर जूनच्या अखेरीस टीकटॉकसह 59 चिनी ऍप्सवर बंदी घातली होती.
  • जुलैमध्ये आणखी 47 ऍप्सवर बंदी घातली.आज 118 ऍप्स बंद केले.बंदी घालण्यात आलेल्या ऍप्सची संख्या 224 झाली आहे.