
जम्मू कश्मीरमध्ये चकमीकदरम्यान हिंदुस्थानी सैन्ये कारी यासिर या दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. कारी यासिर हा पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. यासिर सह दोन दहशतवाद्यांनाही मारण्यात यश आले आहे. शनिवारी उडालेल्या चकमकीदरम्यान या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यात हिंदुस्थानचे 40 जवान शहीद झाले होते. त्या हल्ल्याचा कारी यासिक मास्टर माईंड होता.
कश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यासिर हा पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. यासिर आयईडी ब्लास्टचा तज्ज्ञ होता. तसेच इतर दोन दहशतवाद्यांची ओळख पटलेली असून एकाचे नाव मूस उर्फ अबु उस्मान तर दुसरा बुराहुद्दीन शेख होते. तिन्ही दहशतवादी 26 जानेवारी रोजी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते. शनिवारी उडलेल्या चकमकीत तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.



























































