पुणे – सिंहगड रस्त्यावर सराईताला अटक, दोन पिस्तूलासह 8 काडतुसे जप्त

crime

जनता वसाहतीमधील सराईत गुन्हेगार नीलेश वाडकर आणि कुणाल कानडेच्या एका साथीदाराला गुन्हे शाखेने अटक केले. त्याच्याकडून दोन पिस्तूल, 8 काडतुसे, दुचाकी असा 1 लाख 10 हजारांचा ऐवज जप्त केला. आदिनाथ उर्फ  आदित्य सोपान साठे (वय 25) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीजवळ सराईत गुन्हेगार आदिनाथ उर्फ आदित्य येणार असल्याची माहिती पोलिस शिपाई रमेश राठोड यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पिस्तूल, 8 काडतुसे, दुचाकी जप्त करण्यात आली. आदिनाथ उर्पâ  आदित्य सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध दत्तवाडी आणि येरवडा पोलिस ठाण्यातंर्गत खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, सुनील पवार, रमेश राठोड, सचिन ढवळे, गणेश काळे, शीतल शिंदे, भालचंद्र बोरकर, सुहास कदम यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या