
सामना प्रतिनिधी । पुणे
पुण्यात एका 60 वर्षाच्या वृद्धाने दोन लहान मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोथरुड येथील सुतारदऱ्यात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोथरुड परिसरातील सुतारदरा भागात मंगळवारी एका 60 वर्षांच्या वृद्धाने सख्ख्या बहिणींवर बलात्कार केला. या दोघींचे अनुक्रमे तीन आणि पाच वर्षे इतके आहे. या दोघींवर बलात्कारा झाल्याचे कळताच कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. दरम्यान, आरोपी अद्याप फरार असून पोलीस तपास सुरू आहे.



























































