‘भारत बायोटेक’च्या प्लॅण्टसाठी पुण्यात तातडीने जागा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bharat-biotech-covaxin

लस उत्पादक ‘भारत बायोटेक’च्या प्लॅण्टसाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली. दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीत डेडिकेटेड कोविड सेंटरचे उद्घाटन पवार यांनी मंत्रालयातून ऑनलाइन पद्धतीने केले. यावेळी अजित पवार यावेळी म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. भारत बायोटेक कंपनीच्या प्लॅण्टला पुण्यात जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार नियोजन सुरू आहे. ते कामही तातडीने मार्गी लागेल. उद्घाटन कार्यक्रमाला आमदार राहुल कुल, दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, यवतचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर आदी व्हीसीद्वारे उपस्थित होते.