पुण्यातला हॉटस्पॉट ठरलेला भवानी पेठ भाग कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सर्वात आधी कोरोनाने थैमान घातलेल्या मुंबई आणि पुण्यातील काही भाग आता कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज धारावी कोरोनामुक्त झाली असतानाच पुण्यातही एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेला भवानी पेठ हा भागही पहिल्यांदाच कोरोनामुक्त झाला आहे. दिवसभरात आज इथे एकही नवीन कोरोना रुग्ण सापडला नाही.

राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण 9 मार्च 2020 रोजी सापडल्यानंतर पुण्यातील भवानी पेठ हा पहिलाच कोरोना हॉटस्पॉट म्हणून समोर आला होता. पहिल्या लाटेत भवानी पेठेतील कोरोनाची साथ आटोक्यात आणायला तब्बल सहा महिने लागले होते. त्यानंतर ढोलेपाटील रोड, बिबवेवाडी, हडपसर, येरवडा, सिंहगड रोड असे एका पाठोपाठ नवनवे हॉटस्पॉट वाढतच गेले. दुसऱया लाटेत मात्र पहिल्यापासून भवानी पेठ या एकेकाळच्या हॉटस्पॉटमध्ये कोरोना बऱयापैकी नियंत्रणात होता आणि आज तर तिथे एकही रुग्ण सापडला नाही.