Pune – जादा व्याज मिळवून देण्याच्या आमिषाने 48 लाखांचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फायनान्स कंपनीकडून जादा व्याज मिळवून देण्याच्या आमिषाने एकाने व्यावसायिकाला तब्बल 48 लाखांचा गंडा घातला. ही घटना डिसेंबर 2021 ते एप्रिल 2022 कालावधीत बाणेरमध्ये घडली.

दीपक रमेश शिंदे (वय – 27, रा. बाणेर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गौरव रामकुमार गोयल (वय – 35) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दीपक आणि गौरव यांची ओळख झाली होती. त्यानंतर दीपकने त्यांना सीए, फायनान्सर, शेअर मार्केट याबाबत लोकांचे हात पाहून भविष्य सांगतो, अशी बतावणी केली. गौरवसोबत ओळख वाढवून फायनान्समध्ये जादा व्याज मिळवून देतो असे सांगून वेळोवेळी 48लाख रूपये घेतले. मात्र, त्यांना पुन्हा माघारी पैसे दिले नाही. फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.