खूनाचा प्रयत्न करणाऱ्या सराईताला बार्शीतून अटक, गुन्हे शाखेची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तरूणावर हल्ला करून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेने बार्शीतून अटक केले.  त्याच्याविरुद्ध  खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर मारामारीचे,आर्म अ‍ॅक्ट असे अनेक  गंभीर  गुन्हे दाखल आहेत. सूरज ऊर्फ धनंजय नारायण अडागळे (रा.पद्मावती, मूळ- खांडवी, बार्शी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर परिसरातील तरूणावर खुनी हल्ला करून फरार झालेला सराईत बार्शीतील खांडवी गावी वेषांतर करून राहत असल्याची माहिती पोलीस अमंलदार गजानन सोनुने आणि अजित फरांदे यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपी सूरज उर्फ धनंजयला त्याच्या मूळ गावातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, यशवंत आंब्रे, किशोर वग्गू, चंद्रकांत महाजन, गजानन सोनूने, निखील जाधव, अजित फरांदे, समीर पटेल, कादीर शेख, गोपाळ मदने यांच्या पथकाने केली.