काय सांगता… मच्छरांमुळे पुण्यात राडा, एकाचे डोके फोडले

प्रातिनिधिक

प्लास्टिक टाकीतील पाण्याची गळती होऊन झालेल्या मच्छरांमुळे त्रास होत असल्याने एकाने बांधकाम सुपरवायझर तरूणाला टाकी बाजूला काढण्याचे सांगितले होते. त्याचा राग आल्यामुळे तरूणाने एकाचे हेल्मेटने डोके फोडून जखमी केले आहे. ही घटना तीन दिवसांपूर्वी डॉ. बंदरवाला लेपस्त्री हॉस्पिटल कर्मचारी निवासात घडली.

याप्रकरणी शुभम कंन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर प्रशांत (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण भाना पाटडिया (वय – 47, रा. येवलेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील येवलेवाडीत एका इमारतीच्या बांधकामासाठी आलेल्या कामगारांसाठी बांधकाम सुपरवायझर प्रशांतने परिसरात पाण्याची टाकी ठेवली होती. मात्र, ती टाकी गळत असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर मच्छर झाले होते. त्यामुळे तेथील कर्मचारी निवासमध्ये राहायला असलेल्या किरण यांनी शुभमला टाकी दुसरीकडे घेउन जाण्यास सांगितले होते. त्याचा राग आल्यामुळे प्रशांतने किरण यांना शिवीगाळ करून हेल्मेटने त्यांच्या डोक्यात मारहाण केली. जखमी झाल्यामुळे किरण यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या