पुणे – वाहनचालकांना लुटण्याच्या तयारीत टोळीला अटक

पुणे-सातारा महामार्गावर वाहने अडवून लूटमार करणाच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज बोगद्यानजीक अटक केली. त्यांच्याकडून घातक शस्त्र जप्त केले आहेत.

सुरेश बळीराम दयाळू (वय 29, रा. बिबवेवाडी), चांद फकरोद्दीन याकूब शेख (वय 22), कृष्णा विक्रम ढावरे (वय 22), असिफ अल्लाबक्ष शेख (वय 21), आशिष नवनाथ डाकले (वय 25, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

शहरातील जुन्या कात्रज बोगद्याजवळ पाच ते सहाजण शस्त्रास्त्रे घेउन वाहनचालकांना लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी शंकर कुंभार व जगदीश खेडकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुरेश, चांद, कृष्णा, असिफ, आशिषला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे घातक शस्त्रे मिळून आली. चौकशीत त्यांनी वाहनचालकांना लुटमार करणार असल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस निरीक्षक वसंत कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीधर पाटील, गणेश सुतार, राजू वेगरे, निलेश खोमणे, प्रणव संकपाळ, समीर बागसीराज, हर्षल शिंदे, शिवदत्त गायकवाड, प्रदीप शिंदे यांच्या पथकाने केली. टोळीप्रमुख सुरेश दयाळू हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. शेख हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या