पुणे – गुलटेकडीत सरकारी वाहनांच्या बॅटऱ्यांची चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोटार वाहन विभागाच्या गुलटेकडी डेपोतून आठ सरकारी वाहनांच्या बॅटऱ्या चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद पायगुडे यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी पायगुडे हे मोटार वाहन विभागात निरीक्षक पदावर कार्यरत आहे. त्यांनी डेपोमध्ये आलेली सरकारी वाहने गुलटेकडी येथील मोटार वाहन विभागाच्या डेपोत लॉक लावून दि. 28 एप्रिलला रात्री दहा वाजता पार्क केली होती. सकाळी सहा वाजता काही वाहने कामासाठी नेण्यापूर्वी सकारी वाहनांची व इतर ठिकाणी असलेल्या वाहनांच्या बॅटरीची तपासणी केली असता, तेथील वाहनांमधील 8 बॅटNया चोरून नेल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.