
शहरातील पर्वती आणि शिवाजीनगरमधील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी 4 लाख 25 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामानिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने मिळून 2 लाखांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अनिकेत अशोक खुडे उर्फ शायना गुरू (वय 33, रा. पर्वती दर्शन) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिवाजीनगरमध्ये वाईनशॉपी फोडली
पुणे- बंद वाईनशॉपीचे कुलूप तोडून चोरट्यांनी 2 लाख 20 हजार रूपयांची रोकड चोरून नेली. ही घटना काल दीप बंगला चौकात घडली. याप्रकरणी कश्यप पंकज रवासिया (वय 32, रा. बाणेर) यांनी चतृःशृगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.



























































