शहरातील स्वारगेट परिसरात तरूणावर जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या टोळी प्रमुखासह तिघाजणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. गोविंदसिंग टाक (रा डायस्प्लॉट गुलटेकडी), राहुल उर्फ लल्लन कांबळे (रा मंगळवारपेठ ) आणि गणेश तुपे (रा मंगळवार पेठ ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तरूणावर खूनी हल्ला करून फरारीटोळी प्रमुखासह साथीदारांची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ आणि पथकाकडून घेण्यात येत होती. संबंधित आरोपी एका ठिकाणी असल्याची माहिती पोलीस शिपाई ज्ञाना बडे आणि मनोज भोकरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून गोविंदसिंग टाक, राहूल कांबळे आणि गणेश तुपे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार कुंभार,पोलीस शिपाई ज्ञाना बडे आणि मनोज भोकरे यांनी केली आहे.



























































