
सोलापूर बाजार रस्ता भागात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला लष्कर पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून घातक शस्त्रे, मोबाईल, दोरी असा 62 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सुमित फ्रॅकीहॉल (वय – 29, सोलापूर बाजार), कृष्णा बाळू भारसकर (वय – 24, गुलटेकडी), प्रदीप रामा अडगाळे (वय – 32, सोलापूर बाजार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांच्या अन्य दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
लष्कर पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान शनिवारी रात्री सोलापूर बाजार रस्त्यावरील हंस इलेक्ट्रॉनिक्स गार्डन जवळील मोकळ्या जागेत काही संशयित थांबायची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोरी, पेपर स्प्रे, मोबाईल, घातक शस्त्रे असा 62 हजार 400 रुपयांचा ऐवज मिळून आला. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या अन्य दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक गुजर करत आहेत.



























































