पुणे – रिक्षा प्रवाशांची लुटमार करणाऱ्या चौघा सराईतांना बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिक्षामध्ये बसवून प्रवाशांची लुटमार करणाऱ्या चौघा सराईतांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. वशिम अजमल खान (वय 31, रा. कोंढवा, मूळ- जळगाव), मोसिन खान नुर खान पठाण (वय 28, रा. जळगाव), अन्सार आयुब खान (वय 32, रा. कोंढवा) , अब्दुल करिम बार्शीकर (वय 26, रा. लोणीकाळभोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मार्केटयार्ड परिसरातून बालीजीनगरमध्ये जाताना प्रवाशी सेलवम पिल्ले (वय 48) यांना मारहाण करून त्यांची सोन्याची चेन हिसकावून नेल्याची घटना 2 जुलैला घडली होती. याप्रकरणी सहकानगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई आणि पोलीस निरीक्षक युनूस मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे यांच्याकडून तपास सुरू होता. सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपी कोंढवात रिक्षात बसल्याची माहिती पोलीस अमंलदार संदीप ननवरे आणि सागर शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी लुटमार केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, एसीपी सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, पोलीस निरीक्षक युनूस मुलाणी, पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, बापु खुटवड, प्रकाश मरगजे, संदीप ननवरे, सतीश चव्हाण, भुजंग इंगळे, सागर शिंदे, महेश मंडलिक, प्रदीप बेडीस्कर यांनी केली.