पिंपरी – घरात झोपलेल्या महिलेचा केला विनयभंग

1657

खिडकीतून हात घालून दरवाजाची कडी उघडून चोरट्याने घरातील पाच हजाराची रोकड आणि मोबाईल असा 20 हजाराचा ऐवज चोरला. तसेच घरात झोपलेल्या महिलेचा विनयभंग केला. महिलेसह तिच्या पतीने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना खाली पाडून चोरट्याने पळ काढला. ही घटना चाकण – नाणेकरवाडी येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुघ्ळचे उत्तरप्रदेशचे असणारे हे दाम्पत्य 9 मे रोजी रात्री नेहमीप्रमाणे घरात झोपले होते. चोरट्याने खिडकीतून हात घालून दरवाजाची कडी उघडली आणि आत घुसला. घरातील 15 हजाराचा मोबाईल आणि पाच हजाराची रोकड असा ऐवज चोरला. त्यानंतर चोरट्याने घरात झोपलेल्या महिलेचा विनयभंग केला. त्यामुळे जाग आलेल्या महिलेसह तिच्या पतीने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाण करून खाली पाडून चोरट्याने पळ काढला. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या