
व्हॉट्सअॅपवर झालेल्या ओळखीतून तरुणाने एका विवाहित महिलेच्या गळ्याला चाकू लावून लॉजमध्ये नेउन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यालगत असलेल्या एका लॉजमध्ये घडली.
याप्रकरणी सूरज चंद्रकांत माने (वय 20) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची सूरजसोबत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर ओळखीचा गैरफायदा घेत सूरजने 27 सप्टेंबरला महिलेला भारती विद्यापीठ परिसरात बोलाविले. त्यानंतर महिलेच्या गळ्याला चाकू लावून लॉजवर नेउन अत्याचार केले. तिचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पतीला ठार करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेंद्र ताम्हाणे तपास करीत आहेत.






























































