पुणे – भरदिवसा विश्रांतवाडीत महिलेचे दागिने हिसकाविले

मोबाईल शॉपीचे उद्घाटन झाल्यानंतर भरदिवसा रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी 3 लाख 60 हजार रूपयांचे दागिने हिसकावून नेले. ही घटना काल संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडीतील टिंगरेनगरमध्ये लिली अपार्टमेंटसमोर घडली. याप्रकरणी 54 वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या मुलाच्या मोबाईल शॉपीचे काल उद्घाटन होते. उद्घाटनानंतर महिला दागिने घालून एकटीच लिली इमारतीसमोरून पायी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण, नेकलेस असा मिळून 3 लाख 60 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या