पुणे – उरूळी देवाचीमध्ये चाकूच्या धाकाने तरूणाला लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लघुशंकेसाठी थांबलेल्या तरूणाला मोटारीतून आलेल्या तिघांनी चाकूच्या धाकाने लुटल्याची घटना उरूळी देवाची येथील सुदर्शन मोटारसमोर घडली आहे. याप्रकरणी 37 वर्षीय तरूणाने लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार मोटारीतील तीन व्यक्तीच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तरूणाने उशीरा तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण हे त्यांच्या साडूसोबत 6 एप्रिलला फुरसुंगी येथे घरी निघाले होते. त्यावेळी साडेअकराच्या सुमारास ते उरूळी देवाची येथे लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी मोटारीतून आलेल्या तिघा चोरट्यांनी त्यांना चावूâचा धाक दाखविला. चोरट्यांनी तरूण आणि त्यांच्या साडूजवळील 10 हजार रूपये किंमतीचे मोबाईल हिसकावून नेले. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिस अधिक तपास करत आहेत.