
घरामध्ये गॅसच्या टाक्यांचा विनापरवाना साठा करून ठेवणे कामगाराच्या अंगलट आले आहे. गॅसगळती होउन झालेल्या स्फोटात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना १६ मार्चला रात्री साडेआठच्या सुमारास धनकवडीतील मस्के चाळीत घडली.
मंगुसिंग रामसिंग मांगलिया (वय ४८ रा. धनकवडी), मनोहरवुंâवर मांगलिया (वय ४०), बबलुसिंग उर्पâ बलविरसिंग राठड (वय २८ सर्व रा. राजस्थान) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगुसिंग मूळचा राजस्थानचा असून गॅस टाक्या वाहतूकीचे काम करतो. काही दिवसांपुर्वी त्याने घरामध्ये व्यावसायिक गॅसच्या टाक्यांचा साठा करून ठेवला होता. १६ मार्चला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मंगुसिंगची पत्नी मनोहरवुंâवर स्वयंपाक करण्यासाठी गॅस पेटवित होत्या. त्यामुळे गॅसगळती होउन मोठा स्फोट झाल्यामुळे मनोहरवुंâवर यांच्या साडीने पेट घेतला. त्यामुळे मंगुसिंग आणि बबलुसिंग आग विझविण्यासाठी गेले असता, दोघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे तपास करीत आहेत.

























































