
शहरातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकावर खूनी हल्ला करून फरार झालेल्या सराईताला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने जेरबंद केले. मागील चार महिन्यांपासून तो फरार होता. नवनाथ गोविंद आढागळे (वय 32 रा. लक्ष्मी नगर येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एक सोमवारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी खूनाच्या प्रयत्न केला होता. त्यातील तो सराईत पुणे स्टेशन परिसरात थांबल्याची माहिती पोलीस नाईक गणेश पाटोळे आणि अक्षय गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून नवनाथ आढागळे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
ही कामगिरी एसीपी गजानन टोम्पे, पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, उपनिरीक्षक शुभांगी नरके गणेश पाटोळे, अक्षय गायकवाड यांनी केली.























































