पुण्यात गणेश पेठेत बेकायदा विक्रीसाठी आणलेली 30 कासवे जप्त, दोघे ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील गणेश पेठेत बेकायदेशीरित्या विक्रीसाठी आणलेली 30 कासवे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांना गणेश पेठेत दोघेजण कासव विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पथक तयार करून या दोघांना रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ असलेल्या एका बॉक्समध्ये30 कासवे जप्त करण्यात आली. त्यातील 20 कासवे स्टार प्रजातीची तर 10 कासवे ब्लॅक स्पॉटेड पाँड टरटेल प्रजातीची आहेत. आरोपींनी ही कासवे कोठून आणली होती, त्याची विक्री कोणाला करणार होते याचा तपास वन विभागाचे अधिकारी करीत आहेत.