पुणे : अॅपवरचे ‘गे डेटिंग’ पडले महागात, नग्न फोटो काढून 10 हजार लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डेटिंगसाठी तरुणी पुरवतो म्हणून जेष्ठ नागरिकाकडून पैसे उकळल्याची घटना ताजी असताना तरुणाची गे डेटिंग अॅपवर ओळख झाल्यानंतर त्याला भेटण्यास बोलावून नग्न फोटो काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाने फोटो काढण्यास नकार दिल्याने तिघांनी त्याला हत्याराचा धाक दाखवून फोन पेद्वारे 10 हजार ट्रान्सफर करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार काल कोंढव्यात घडला आहे. याप्रकरणी 35 वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वानवडी भागात राहण्यास असून त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांची एका आरोपीसोबत “ब्ल्यूड गे डेटिंग अॅप” ओळख झाली होती. त्यानंतर त्यांचे चॅटिंग सुरू झाल्याने दोघांनी सहमतीने भेटायचे ठरवले. यानंतर ते कोंढवा बुद्रुक परिसरात भेटले. त्यावेळी आरोपीने तरुणाचे नग्न फोटो काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे तरुणाने विरोध करताच आरोपीने आणखी दोघांना खोलीत बोलावले. तिघांनी तरूणाला मारहाण करत हत्याराचा धाक दाखविला. आरोपींनी जबरदस्तीने तरुणाच्या फोन पेद्वारे हजार 10 रुपये स्वतः च्या बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर आरोपी पसार झाले. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.