पुणे- महिला सेवाग्रामातून दोन मुली बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

पुण्यातील कर्वे रस्त्यावरील एका संस्थेतून दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत कर्वे रस्त्यावरील कुसुमबाई मोतीचंद महिला सेवाग्राम संस्थेतील अधिकारी महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या दोन मुलींना कोणीतरी फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय तक्रारदाराने फिर्यादीत व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे तपास करत आहेत.