कवठे येमाईत जैन बांधवांची कार्तिकी पौर्णिमा उत्साहात

393

जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे जैन बांधवांची कार्तिकी पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी होत आहे. या निमित्ताने मंगळवार  सकाळपासूनच येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  सकाळी कवठे येमाई गावातून आराधना भावना येथून भगवान महावीरांच्या पालखीची व देवतेची बँडच्या सवाद्य व महावीरांच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. येथील तीर्थक्षेत्र भगवान नमिनाथ मंदिरात सिद्धगिरीच्या पटापुढे 21 खमासयण, स्नात्रपुजा,चैत्यवंदन, आरती, शातिकलश स्तवन अशा विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.

तालुक्याच्या पश्चिम भागातील  टाकळी हाजी, जांबुत, मलठण, सविंदणे व इतर भागातून  येथीन जैन बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. यामध्ये महिलांचीही उपस्थिती मोठी होती. कार्तिकी पौर्णिमेस जैन बांधवांच्या चातुर्मासाची सांगता होत असते. जैन धर्मीयांचे पवित्रस्थान पालिताना येथे असून तेथे सर्वच जण जाऊ शकत नाहीत. त्यामुळे जैन मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी मिठुलाल बाफणा, सुरेश गांधी, संदिप रणवाल व जैन बांधव,भगिनी  मोठया संखेने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या