
भरधाव वेगात दुचाकी चालवित घसरून पडल्याने झालेल्या अपघातात जेष्ठ नागरिक ठार झाले. हा अपघात 4 जानेवारीला सकाळी अकराच्या सुमारास कात्रज परिसरात घडली.
रमेश केशव ओतारी (वय 71) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश काळे यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जानेवारीला सकाळी अकराच्य सुमारास दुचाकीस्वार रमेश कात्रज परिसरातून निघाले होते. त्यावेळी भरधाव वेगात दुचाकी चालविल्याने घसरून ते खाली पडले. गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.































































