पुणे- महमंदवाडीत दगडात झाकलेला तरुणाचा मृतदेह आढळला

1720

पुणे येथे महंमदवाडीतील एका मोकळ्या जागेत तरुणाचा दगडात झाकून ठेवण्यात आलेला मृतदेह आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर वानवडी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महमंदवाडी येथे हेवन पार्क परिसर आहे. त्याच्या पाठीमागील बाजूस दगडात तरुणाचा मृतदेह लपवून ठेवण्यात आल्याचे नागरिकांना दिसून आले.

माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाचा मृतदेह काढण्याचे बाहेर काढण्यात आला असून त्याची ओळख पटलेली नाही. मात्र त्याचा खुन करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दगडात झावूâन ठेवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या