
पुण्यात क्षुल्लक कारणावरून दोन तरुणांवर कोयत्याने वार करण्यात आला आहे. त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोहन कदम असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
ओम अणि ऋषीकेश रविवारी रात्रीच्या सुमारास दांडेकर पुल परिसरात पेट्रोलपंपासमोर थांबले होते. त्यावेळी तेथून जाताना चुकून माने यांचा पाय एकाला लागला. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. माने त्याठिकाणाहून गुपचूप निघून गेला.
त्यानंतर काही वेळानंतर माने व त्याचा मित्र रोहन कदम शुभम डोलारे मिळून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी रोहनने आरोपींना शिवीगाळ का केली अशी विचारणा केली. त्याचा राग आल्यामुळे दोघांनी रोहन कदम आणि शुभम डोलारे यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यामध्ये रोहन कदम गंभीर जखमी झाला होता. रोहनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी ओम उर्फ भाई राजु सुरवसे आणि बुक्का उर्फ ऋषीकेश कोंडभर यांना अटक केली आहे.






























































