मार्केटयार्ड परिसरात 41 वाहनांची तोडफोड, दहशत निर्माण करणारे 4 सराईत अटकेत

दहशत माजविण्यासाठी टोळक्याने मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकरनगरमध्ये 40 वाहनांची तोडफोड केली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 सराईतांना अटक करण्यात आले आहे. ही घटना काल रात्री साडेदहाच्या सुमारास घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

किरण विनोद थोरात (वय 25), सागर अनिल लोखंडे (वय 22), सचिन परशुराम माने (वय 22), सोमनाथ ज्ञानदेव शिंदे (वय 21) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मार्केटयार्ड परिसरात आंबेडकरनगर वसाहत असून कष्टकरी नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात. पार्विंâगची सोय नसल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून रस्त्यावर वाहनांचे पार्विंâग केले जाते. त्यामध्ये प्रवासी रिक्षा, टेम्पो रिक्षा, दुचाकींचा समावेश आहे. काल रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास 8 ते 10 जणांच्या टोळक्याने हातामध्ये तलवारी, लोखंडी रॉड, काठ्या घेऊन आंबेडकरनगरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. आरडा-ओरडा करीत टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड केली. तोडफोडीसह वाहनांचे सीट देखील फाडल्या आहेत. तब्बल तासभर टोळक्याचा धुडगूस सुरू होता. त्यानंतर मार्केटयार्ड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तोडफोड झालेल्या वाहनांची पाहणी करून आरोपींचा शोध घेत 4 जणांना अटक करण्यात आले आहे. वाहनांच्या तोडफोडीनंतर स्थानिक नागरिक संतप्त झाल होते.

अटक केलेले 4 आरोपी सराईत

तोडफोडप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केलेले चारही आरोपी सराईत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. परिसरात दहशत माजविण्यासाठी त्यांनी वाहनांची तोडफोड केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती मार्वेâटयार्ड पोलिसांनी दिली आहे.

दहशत माजविण्यासाठी सराईत टोळक्याने कला रात्री वाहनांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. – दुर्योधन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड पोलीस ठाणे

आपली प्रतिक्रिया द्या