शहरातील परिमंडळ एकच्या हद्दीतील सर्व स्वच्छतागृहाची दिवसातून तीन वेळा सफाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मध्यवस्तीतील सर्व पोलीस ठाणे आणि चौक्यामध्ये तसेच हद्दीत असलेल्या सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहाची दिवसातून तीन वेळा साफसफाई केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.त्यासाठी “विशेष पोलीसांच्या” नियुक्त्या करून त्यांची मदत घेतली आहे. महापालिका, विशेष पोलीस अधिकारी आणि जिल्हा प्रशासन यासाठी काम करत आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे पोलिसांच्या परिमंडळ एकमध्ये असलेल्या एका पोलिस ठाण्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे पुणे पोलीसांची कसोटी लागली आहे. स्वतः आरोग्य सांभाळत परिसरात काम करावे लागत आहे. झोपडपट्टी परिसर असल्याने कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे. छोट-छोट्या गल्ल्या आणि जवळ असणारी घरे यामुळे धोका कमी होत नसल्याचे सांगितले जाते. परिसरात “कॉमन टॉयलेटमुळे कोरोना प्रसार वाढत असल्याचे एक निरीक्षण आहे. त्यामुळे पोलिसांनी या भागातील स्वच्छतेची मोहीम देखील हातात घेतली आहे. विशेष पोलीस या परिसरात पालिकेच्या मदतीने कॉमन टॉयलेट दिवसातून 3 ते 4 वेळा स्वच्छ करून घेत आहेत. हे काम करून घेण्याची जबाबदारी पोलिसानी उचलली आहे. एखाद्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडल्यास त्याच्या संपर्कात कोण कोण असू शकते, तो कुठे जाऊ शकतो याची माहितीही गोळा केली जात आहे. पोलिसांना मदत करण्यासाठी 150 विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संबंधित पोलीस याच परिसरातील सल्याने त्यांना याभागाची पूर्ण माहिती आहे. कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या घर आणि त्याच्या आजूबाजूचे 10 ते 15 घरांवर पोलीस जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित करत आहेत.