पुण्यात ब्राह्मण महासंघाकडून चिनी वस्तूंची होळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि चीन दरम्यान दिवसेंदिवस तणाव वाढत असतानाच चिनी मालावर बहिष्कार घालण्यात संदर्भात मागणी देशात जोर धरायला लागली आहे. पुण्यातील सावरकर स्मारक येथे सोमवारी ब्राह्मण महासंघ आणि समविचारी संघटनांनी चिनी वस्तूंची होळी केली. देशात चिनी वस्तूंचा वापरावर बंदी घालण्यात यावी असा निर्धारही या वेळी व्यक्त करण्यात आला. चीनकडून कोरोनाचा प्रसार जाणून-बुजून केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच कोरोना संकट काळात सीमेवर चीनकडून सुरू असलेल्या कारवायांमुळे सर्वसामान्यांमध्ये चीन विरोधात असंतोष खदखदत आहे. चीनचा निषेध म्हणून ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांच्या पुढाकारातून पुण्यात चिनी वस्तूंची तोडफोड करत होळी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी चिनी बनावटीचे मोबाईल आपटून तसेच चीनचा राष्ट्रध्वज फाडून निषेध नोंदवला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याच ठिकाणी विदेशी वस्तूंची होळी केली होती.