
इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या चार दुचाकींवर अज्ञाताने ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिल्याची घटना 7 मे ला येरवड्यातील देवी अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी अमित सिंधीकुमटे (वय 30) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित हे देवी अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत. त्यांनी इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी केलेल्या दुचाकी अज्ञातांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास पेटवून दिली. तसेच परिसरातील इतर तीन दुचाकीही पेटवून 1 लाख 90 हजारांचे नुकसान केले आहे.































































