बाईकवर स्टंट करणाऱ्याला पोलिसांनी पकडले, निघाला सऱ्हाईत वाहनचोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेडीवाकडी दुचाकी चालवून वेगाने जाणाऱ्याचा संशय आल्यामुळे विश्रामबाग पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत तो सराईत दुचाकी चोर असल्याचे उघडकीस आले आहे. त्याने शहरातील विविध भागातून दुचाकींची चोरी केली असल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून 1 लाख 20 हजारांच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दत्ता वामनराव निकम (वय 21, रा. धनकवडी, मूळ-मोगदळ, चाकूर, लातूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी वेडीवाकडी वळणे घेत दुचाकीस्वार जात असल्याचे पथकाला दिसले. त्यानुसार पोलिसांनी पाठलाग करून दत्ता निकम याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने कुमठेकर रस्त्यावरून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, पोलीस आयुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे, पोलीस निरीक्षक कुंडलिक कायगुडे, पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे, गणेश मोकाशी, संजय दगडे, बाबासाहेब दांगडे, धीरज पवार, विठ्ठल खिलारे, हेमंत पालांडे, प्रशांत शिंदे, साताप्पा पाटील, अभिजीत गोंजारी यांच्या पथकाने केली.