
अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचा पुणे ग्रामीण विभाग दि. 12 डिसेंबर पासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार असून ग्रामीण भागातील डाक कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचा इशारा अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे अशी माहिती आवाहन संघटनेचे पुणे जिल्हा सचिव एकनाथ मंडलिक यांनी दिली.
ग्रामीण भागातील डाक सेवक हा गेले अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे काम करत असून गेली अनेक वर्ष डाक कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कामाची वेळ चार तासाची असतानाही डाक कर्मचारी आठ तास काम करत आहेत. मात्र त्यांना चार तासाचेच वेतन मिळत आहे. संघटनेच्या वतीने जी.डी.एस.कर्मचाऱ्यांना 8 तासाचे काम देऊन नियमित कर्मचारी म्हणून घोषित करावे, विभागीय कर्मचान्यांप्रमाणे पगारी रजा, घरभाडे भत्ता, टीए/डीए, पेन्शन, मेडिकल सुविधा, शिक्षण भत्ता सुविधा लागू कराव्यात, डॉ. कमलेशचंद्र कमिटीच्या सर्व सकारात्मक शिफारशी विभागीय कर्मचान्यांप्रमाणे 1/1/2016 पासून सिनिअर जुनिअर चंचिंग 12, 24, 36 प्रमोशन, ग्रुप विमा 1 लाख रु. ग्रॅज्युटी 1 लाखच 180 दिवसांची पगारी रजा व रोखीकरण करण्यात यावे, वैद्यकीय सुविधा कुटुंबासह देण्यात यावी, इंडीया पोस्ट पेमेंट बैंकचे च म.न.रे. गा. चे काम कमिशन ऐवजी वर्कलोडमध्ये सामाविष्ट करण्यात यावे या महत्त्वाच्या मागण्यांसाठी बेमुदत संप घोषित करण्यात आला आहे.
यापूर्वीही संघटनेच्या वतीने महाराष्ट्र स्तरावर मुंबई येथे एक दिवशीय उपोषण केले होते. दिल्ली येथे साखळी उपोषण केले होते मात्र सरकारने फक्त आश्वासन दिले असून मागण्या मान्य केल्या जात नाहीत त्यामुळे 12 तारखेपासून सुरू होणाऱ्या संपात सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे पुणे जिल्हा सचिव एकनाथ मंडलिक, आंबेगाव तालुका संघटक हरीभाऊ थोरात यांच्या वतीने करण्यात आले आहे.

























































