पुण्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच

पुण्यात गेल्या काही दिवसांत घरफोडीच्या घटनात लक्षणीय वाढ झाली आहे. पाषाण रोडवरील एका दुकानाचे शटर फोडून ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तर भेकराईनगर येथे घरफोडी करून ३२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी व हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पाषाण परिसरात राहणारे इमामुद्दी निजामुद्दीन शेख (३७) यांचे के के जनरल स्टोअर्स या दुकानात चोरी झाली आहे. सोमवारी रात्री त्यांनी रात्री नऊच्या सुमारास दुकान बंद करून गेले होते. त्यानंतर दुकानाचे शटर उचकटून किराणा मालाचे साहित्य व रोख रक्कम असा ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दुसऱ्या दिवशी घरफोडीचा प्रकार समोर आला आहे.

भेकराईनगर बंद धराचे कुलूप तोडून ३२ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी स्नेहल सुनिल जाधव (२५) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सकाळच्या सुमारास घरामध्ये कोणीही नसल्याची संधी साधुन चोरट्याने कुलूप तोडून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर वस्तू असा ३२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी हडपसर पोलिस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या