
स्वारगेट पाणीपुरवठा केंद्रात तोडफोड केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे हडपसरचे माजी आमदार योगेश टोळेकर यांच्यासह चार नगरसेवक आणि कार्यकर्ते मिळून 36 जणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी माजी आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक वीरसेन जगताप, नगरसेविका रंजनाताई टिळेकर, नगरसेविका कामठे, नगरसेविका भोसले, चेतन टिळेकर याच्यासह 36 जणांना अटक करण्यात आली आहे. अषित वेदप्रकाश जाधव (वय 56) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कोंढवा क्षेत्रीय कार्यालयातंर्गत व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप करीत माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज 35 ते 40 जणांनी स्वारगेट पाणीपुरवठा कार्यालयात आंदोलन केले. टिळेकर यांच्यासह दोन नगरसेवक आणि दोन नगरसेविका यांच्यासह कार्यकत्र्यांनी कार्यालयात गोंधळ करत टेबलावरील वस्तू फेकून काचांची तोडफोड केली. त्याशिवाय माजी आमदार टिळेकर यांनी अषितला कार्यालयाबाहेर ओढत आणून टाळे लावले. अतिष यांच्यासह उपअभियंता राहूल भोसले यांच्या कपाळाला गंध लावून आरती केली. कार्यकत्र्यांनी घोषणबाजी करीत शिवीगाळ केली. त्यानंतर स्वारगेट पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत टिळेकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, कार्यकत्र्यांना अटक केली.
शासकीय कामात अडथळा निर्माण करीत कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी ३६ जणांना अटक करण्यात आली आहे. – अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक, स्वारगेट पोलीस ठाणे































































