नगर – भरदिवसा शिक्षकाच्या घरातून चोरी

266

नगर कल्याण रोड परिसरातील शिवाजीनगर, विद्या कॉलनी येथे भरदिवसा घरफोडी करुन शिक्षकाच्या घरातील हिर्याची अंगठी, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. ही घटना सोमवारी दुपारी दोन ते पाचच्या सुमारास घडली.

कल्याण रोड विद्यानगर परिसरामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून या भागांमध्ये चोरांचा सुळसुळाट चालू आहे. रात्री-अपरात्री या चोरट्यांकडून चोरीचे प्रमाण दिसून येत आहे. विद्या कॉलनी परिसरातील विजय कदम हे इचरजबाई फिरोदिया व संगीता कदम ह्या अरणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. हे दोघं पती पत्नी शिक्षक असल्या कारणाने आणि ते शाळेत गेल्याने घरी कोणी नाही याचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधत घरातील हिर्याची अंगठी, सोन्याचे कर्णफुले असा ऐवज लंपास केला. घरातील सर्व कपाटे, दिवाण यांची उचकापाचक केली. शाळेतून घरी आल्यानंतर ही घटना संगिता कदम त्यांच्या लक्षात आले नंतर त्यानी पती विजय कदम यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी श्‍वान पथकाच्या साहाय्याने चोराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. घरांमधून फिंगर प्रिंट्स पण घेतले आहेत. घरात काम करणारी कामवाली दिड वाजेपर्यत घरात होती. ती गेल्या नंतर हा प्रकार घडला. या वेळेस या भागातील वीज ही गायब झाली होती. यामुळे या भागातील सीसी टिव्ही कॅमेरे बंद झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या