पुण्यातील वाघोली, अहिरेगावात घरफोडी; लाखो रुपयांचा ऐवज लंपास

पुण्यात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी वारजेतील अहिरेगाव आणि वाघोलीत बकोरी फाटा परिसरात दोन घरफोड्या करून लाखो रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी वारजे व लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशालगड कॉलनी न्यू अहिरेगावातील योगीराज हाईटस् सोसायटीतील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून  चोरांनी 2 लाख 46 हजारांचे दागिने व 25 हजाराची रोकड असा 2 लाख 71 हजारांचा ऐवज चोरी केल्याची घटना 7 जुलै रोजी घडली आहे. याप्रकरणी सोमनाथ वांजळे यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद आहे.

त्याशिवाय वाघोलीतील बकोरी फाटा येथील एका इलेक्ट्रीक वस्तूच्या गोडाऊनमध्यून चोरट्यांनी 1 लाख 46 हजारांचे लॅपटॉप व इतर इलेक्ट्रीक वस्तू चोरी केल्या आहेत. याप्रकरणी, रोहीत पुरी यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला असून याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोरे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या