पुण्यात आढळला दुर्मिळ कासव, जादूटोण्यासाठी लाखो रुपयांत होते तस्करी

पुण्यातील उजनी धरणात मासेमारी करत असलेल्या एका मच्छिमाराच्या जाळ्यात एक दुर्मिळ कासव आढळला आहे. इंडियन स्टार असे त्या कासवाचे नाव असून त्याला मच्छिमाराने वन विभागाकडे सोपवले आहे. या कासवाचा वापर जादू टोण्यासाठी केला जात असल्याने या कासवाला आंतरराष्ट्रीय बाजारात तस्करांकडून लाखो रुपये मोजले जातात.

मच्छिमार विनोद काळे व त्यांची पत्नी शीतल काळे हे उजनी धरणात मासेमारी करत असताना त्यांच्या जाळ्यात हे सुंदर कासव अडकले. त्या कासवाला जाळ्यातून सोडवून त्यांनी वन विभागाकडे दिले. हा कासव सामान्य कासवापेक्षा जास्त सुंदर असतो व त्याचे वरचे कवच हे चमकदार असते. त्यावर चांदण्यांच्या आकाराचे पट्टे असतात. हा दुर्मिळ कासव दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका व हिंदुस्थानात आढळतो. हिंदुस्थानात देखील फक्त महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये आढळतो.

आपली प्रतिक्रिया द्या