विजयस्तंभाला अभिवादनामुळे पुणे-नगर महामार्गावरील वाहतूकीत बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bhima-koregaon

पेरणे येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणाहून अनुयायी शिक्रापुरकडे जाणार आहेत. त्यापाश्र्वभूमीवर 31 डिसेंबरला संध्याकाळी 5 ते 1 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत पुणे-नगर महामार्गासह परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

राज्यासह परराज्यातील अनुयायी दरवर्षी 1 जानेवारीला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पेरणे ता हवेली येथे जातात. त्यामुळे परिसरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी 31 डिसेंबर संध्याकाळी पाच वाजेपासून 1 जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत वाहतूक बंद करण्यात आली आहे.

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग

  • चाकण ते शिक्रापूर दोन्ही बाजूकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
  • नगरहून पुणे, मुंबईकडून येणारी जडवाहने ही शिरूर न्हावरा फाटा, पारगाव, चौपुला यवतमार्गे पुण्याकडे वळविण्यात आली आहे.
  • पुण्याकडून नगरकडे जाणारी जड वाहने खराडी बायपास मार्गे हडपसर, पुणे- सोलापूर रस्त्याने चौपुला केडगाव मार्गे नगरकडे वळविण्यात येणार आहेत.
  • सोलापूरहून आळंदी आणि चाकण भागात जाणारी जड वाहने हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडीतून चाकणकडे वळविण्यात येणार आहेत.
  • मुंबईतून नगरकडे जाणारी जड वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, आळेफाटाकडे वळविण्यात येणार आहेत. त्याशिवाय हलकी वाहने मोटार, जीप वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे, नगरकडे वळविली जाणार आहेत.
  • चाकण- तळेगांव चौक- शेल पिंपळगांव-बहुळ-साबळेवाडी अशी दोन्ही बाजुकडील जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात आली आहेत.
  • आळंदी-शेलपिंपळगाव -बहुळ-साबळेवाडी अशी दोन्ही बाजुकडील येणारी सर्व प्रकारची वाहतुक पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
  • आळंदी-मरकळ-कोयाळी-शेलपिंपळगाव-बहुळ-साबळेवाडी दोन्ही बाजुकडील जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतुक बंद करण्यात येणार आहे. मार्गाने वाहतुक वळविण्यात आली आहे.

त्याशिवाय प्रवेश बंदी घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.