गुंड मुलाच्या त्रासामुळे शिक्षकांनी शिक्षा केली, विद्यार्थ्याची आत्महत्या

36
death

सामना ऑनलाईन, पुणे

देहूमधील ऑर्डनन्स फॅक्टरी भागात असलेल्या केंद्रीय विद्यालयातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. वर्गातील गुंड मुलाने त्रास दिला, धमकावलं त्याला शिक्षा करण्याऐवजी मलाच पाच दिवसांसाठी शाळेतून निलंबित केलं असं या विद्यार्थ्याने मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत लिहलं आहे. या मुलाच्या आत्महत्येमुळे चिंचोली गावावर शोककळा पसरली आहे.

विद्यार्थ्याने लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये आपल्यासोबत नेमकं काय घडलं ते या विद्यार्थ्याने सविस्तर लिहलं आहे. एका मुलाने या विद्यार्थ्यानी चित्रकलेची वही फाडली. ही वही का फाडली असा जाब विचारला असता या मुलाने शाळेबाहेरची काही मुलं गोळा केली आणि विद्यार्थ्याला धमकावलं. हे काहीही लक्षात न घेतला शिक्षकांनी मला आणि माझ्या वर्गातील अन्य तिघांना दिवसभर शिक्षकांच्या खोलीबाहेर उभं केलं आणि पाच दिवसांसाठी निलंबित केलं. असं या विद्यार्थ्याने सुसाईड नोटमध्ये लिहलंय.

हा मुलगा रोजच्याप्रमाणे क्लासला गेला होता. क्लासवरून परत येत असताना त्याने एका विहीरीत उडी मारत आत्महत्या केली. पोलिसांनी विद्यार्थ्याच्या सुसाईड नोटच्या आधारे गुन्हा दाखल केला असून नेमकं या विद्यार्थ्यासोबत काय झालं ज्यामुळे त्याने इतकं टोकाचं पाऊल उचचलं हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या