
देशात दरवर्षी लाखो रस्ते अपघात होतात. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याच दिशेने पाऊल टाकत चंडिगडमधील बिटेकच्या 20 वर्षीय विद्यार्थ्याने जबरदस्त सॉफ्टवेअर तयार केले आहे. सीट बेल्ट न लावल्यास आणि मद्यपान केलं असल्यास गाडी सुरूच होणार नाही.
चंडिगड युनिव्हर्सिटीत बिटेकच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेला विद्यार्थी मोहितने रोड पल्स नावाने असं सॉफ्टवेअर तयार केलं आहे ज्याचा वापर केल्यानंतर रस्ते अपघात होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. या सॉफ्टवेअरमध्ये मोहितने लेटेस्ट टेक्नोलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंगचा वापर केला आहे. 2025नंतर देशासह जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंगवरच सर्व कामं होतील हेच पाहता हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आल्याचे मोहितने सांगितले. हे सॉफ्टवेअर कारसाठी लाँच झालं तर रस्ते अपघात मोठ्या प्रमाणात कमी होतील, असा दावा त्याने केला आहे.
- ज्या वेळी कोणीही ड्रायव्हिंग सीटवर बसेल आणि श्वास घेईल त्या वेळी त्याचे कार्बनडायऑक्साईडचे पार्टिकल्स समोर लावलेल्या सॉफ्टवेअरच्या ऑटो मीटरवर इंट्राडे सेंसर डिटेक्ट करून सांगेल की, व्यक्तीमध्ये अल्कोहोलचं प्रमाण लिगल लिमीटपेक्षा जास्त आहे की नाही. हे प्रमाण 0.08 टक्क्यांहून अधिक असल्यास कारचं इंजिन स्टार्ट होणार नाही.



























































