‘ये ढाई किलो का हाथ..’ सनी देओलने अर्ज भरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गुरुदासपूर

बॉलीवूड अभिनेते सनी देओल यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. सनी देओल भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ते गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

सनी देओल यांनी उमेदवारी अर्ज भरताना पगडी परिधान केली होती. तसेच अजय सिंह देओल या नावाने अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह आणि जितेंद्र सिंह उपस्थित होते. सनीचा भाऊ अभिनेता बॉबी देओलही उपस्थित होते. मेरे गुरदासपूरवालें, सत श्री अकाल अशी सुरुवात करून सनीने चाहत्यांशी पंजाबीत संवाद साधला. तसेच दामिनी या चित्रपटातील ‘ये ढाई किलो का हाथ’ हा डायलाँग पंजाबी भाषेत म्हणून दाखवला. त्यानंतर हिंदुस्थान झिंदाबाद, झिंदाबाद है, झिंदाबाद रहेगा, हा गदर चित्रपटातील डायलॉगही समर्थकांसमोर म्हटला. सनी देओल यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांचे आव्हान आहे. जाखड हे विद्यमान खासदार आहेत.